बहुजननामा ऑनलाइन टीम – सगळ्यांना असे वाटते की सुंदर आणि निसर्ग रम्य ठिकाणी आपले सुंदर घर असावे. पण काहींची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना अशा ठिकाणी घरे खरेदी करता येत नाही. पण यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जगातील सर्वात सुंदर देशांमध्ये सुमारे 71 रुपयांमध्ये घरे विकली जात आहेत. हे शहर नैसर्गिकरित्या सुंदर आहे. तिने अनेक घरे आहे. तिथले प्रशासन अवघ्या 71 रुपयांना विकायला तयार आहे.
आता या शहरात केवळ 3800 लोक शिल्लक आहेत. बहुतेक लोक वृद्ध आहे. येथील तरुण नोकरीसाठी इतर देशात गेले आहेत. या शहराच्या सभोवती सुंदर पर्वत आहेत. हिवाळ्यात ते पूर्णपणे बर्फाने झाकलेले असते. उन्हाळ्यात येथे दऱ्यांमध्ये रंगीबेरंगी फुले उमलतात. येथे प्रदूषण होत नाही. तेथील हवा अतिशय स्वच्छ आहे. तिथे लोक फार कमी प्रमाणात आजारी पडतात.
येथील सांस्कृतिक कौन्सिलर अँजेला कॅनिझारो म्हणाल्या की, ४० वर्षांपूर्वी येथे ८००० हून अधिक लोक वास्तव्य करीत होते. पण आता फक्त 3800 लोक शिल्लक आहेत. कारण बहुतेक तरुण रोजगारामुळे शहराबाहेर गेले आहेत. आता फक्त त्यांचे पालक इथेच राहतात. लोकांची घरे रिकामी आहेत. म्हणूनच हे लोक इतक्या स्वस्त घरे विकत आहेत.
बिव्होना असे या शहराचे नाव आहे. ते इटलीमधील सिसिली येथे आहे. इथल्या लोकांची अशी इच्छा आहे की, जेव्हा बाहेरील लोक येथे राहतील तेव्हा त्यांना तेथील संस्कृती आणि वारसा माहित होईल. ते आपली संस्कृती आणि वारसा वाचविण्यात मदत करतील. तसेच शहर पुन्हा गजबजेल.
Visit : bahujannama.com