मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Chitra Wagh On Thackeray Government | राज्याच्या इतिहासातील राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election Result 2022) निकालाची नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले आहेत. तर, शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना पराभव स्विकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्याने भाजप विजयोत्सव साजरा करत आहे. अशातच भाजप नेत्यांकडून शिवसेना आणि आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे. यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1535457336059342849
चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारला प्रत्युत्तर देत करेक्ट कार्यक्रम म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “करेक्ट कार्यक्रम.. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर,” असं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. (Chitra Wagh On Thackeray Government)
https://twitter.com/ChitraKWagh/status/1535453234675843072
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, “भाजपाचे तीन ही उमेदवार राज्यसभेवर. पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक विजयी… देवेंद्र फडणवीस यांचा चमत्कार. सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन” असं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या 106 मतांशिवाय त्यांना अधिकची मतं 17 मिळवण्यात यश आलं आहे. दुसरीकडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ”निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, ” अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Web Title :- Chitra Wagh On Thackeray Government | bjp leader chitra wagh slams thackeray government over devendra fadnavis Rajya Sabha Election Result 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Rajya Sabha Election Results-2022 | ‘देवेंद्र फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश’ – शरद पवार
- Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर
- Sharad Pawar On Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘चमत्कार मान्यच केला पाहिजे’
- Rajya Sabha Election Results | “निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती” – देवेंद्र फडणवीस
- UPI Credit Card Linking | RBI च्या मंजूरीनंतर ‘या’ बँकांच्या क्रेडिट कार्डने होईल यूपीआय पेमेंट, असे करा लिंक