मुंबई ; बहुजननामा ऑनलाइन – Chitra Wagh On Shiv Sena | विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra MLC Election) भाजपने (BJP) पुन्हा एकदा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धक्का दिला आहे. भाजपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. तर आघाडी सरकारचे पाच उमेदवार निवडून आले असले तरी काँग्रेसच्या (Congress) एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. आघाडी सरकारमधील मते फुटल्यानं हा धक्कातंत्र सहन करावा लागला आहे. तर दुसरीकडे कालपासून शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुजरातमध्ये आहे. ते 25 आमदारांसोबत असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. (Chitra Wagh On Shiv Sena)
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,. “काल काही फुटले, आज 13 झाले. यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात.” असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर “जय हो…विजय हो देवेंद्र फडणवीसजी” असं देखील त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये “पैलवान तेल लावून आले होते पण खेळ बुद्धिबळाचा होता” असं म्हटलं आहे. (Chitra Wagh On Shiv Sena)
—
जय हो…..विजय हो @Dev_Fadnavis जी pic.twitter.com/eB4QY8f8AE
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 21, 2022
दरम्यान, राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. तरी देखील, भाजपाने विजय खेचून आणत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत नाराजीचा सूर दिसून आला आहे. त्यामध्येच, शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आपला नियोजित कार्यक्रम सोडून रात्रीच सूरतला पोहचले होते.
Web Title :- Chitra Wagh On Shiv Sena | bjp chitra wagh slams shivsena over vidhan parishad election and eknath shinde