मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Chitra Wagh On Sanjay Rathod | शिंदे-फडणवीस यांनी कालच, मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच स्थान दिले जाईल असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) अनेक वादग्रस्त नावे समोर आल्याने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये सुद्धा आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे शिंदे-फडणवीसांच्या (Shinde-Fadnavis Government) या कृतीला घरचा मोठा आहेर मिळाला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणातील संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Chitra Wagh On Sanjay Rathod)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पूजा चव्हाण प्रकरणातील शिंदे गटातील (Shinde Group) वादग्रस्त आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathor) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ संतप्त झाल्या आहेत. राठोड यांनी शपथ घेतल्यानंतर काही मिनिटातच चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे. या ट्विटसोबत वाघ यांनी एक व्हिडिओ सुद्धा जोडला आहे. (Chitra Wagh On Sanjay Rathod)
चित्रा वाघ यांनी म्हटले की, पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे, असे म्हणत वाघ यांनी शिंदे-फडणवीस सरकार मोठा धक्का दिला आहे. या टि्वटमध्ये ‘लडेंगेः जितेंगे’ असे म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री (CM) कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केले आहे.
बीड जिल्ह्यातील (Beed District) परळीच्या (Parli) पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यात आत्महत्या (Suicide) केली होती.
पूजाने पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
पूजासोबत राहणार्या दोन जणांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ उडाल्याने आणि चित्रा वाघ यांनी प्रकरण उचलून धरल्याने
यात नाव आलेले तत्कालीन शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (Audio Clip Social Media) आजही आहेत,
यामध्ये संजय राठोड यांचा आवाज आहे. यामुळे राठोड चांगलेच अडचणीत आलेले आहेत.
आज संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी उघडपणे त्याला विरोध केल्याने शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे.
Web Title :- Chitra Wagh On Sanjay Rathod | chitra kishor wagh says its unfortunate that pooja chavan death case accused mla sanjay rathod take oath as minister in shinde cabinet expansion
हे देखील वाचा :
Maharashtra Cabinet Expansion | ‘काही नावं टाळली असती तर…’; शपथविधी पाहून अजित पवारांचा टोमणा