Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi | ‘राहुल गांधी आणि तुषार गांधी आपल्या पणजोबांच्या पुण्याईवर जगणारे दोन निरुपयोगी जीव’ – चित्रा वाघ

Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi | 'Rahul Gandhi and Tushar Gandhi two worthless souls living on their great-grandfather's Punai' - Chitra Wagh

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi | राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्मारीसाठी निघालेली ‘भारत जोडो पदयात्रा’ (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी हिंगोलीच्या (Hingoli) सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांवर भाष्य केल्याने ही यात्रा प्रसिद्धी झोतात आली आहे. त्यावरुन भाजप आणि शिंदे गट राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो पदयात्रेवर टीका करत आहेत. शुक्रवारी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी यांनी राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानाला दुजोरा दिला होता. त्यावर आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर भाष्य केले आहे. आपापल्या पणजोबांच्या पुण्याईवर दोन निरुपयोगी जीव देशात जगत आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या. (Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तुषार गांधी शुक्रवारी शेगावमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांच्या विधानाला समर्थन दिले. राहुल गांधी यांनी सत्य तेच सांगितले, असे तुषार गांधी म्हणाले होते.

 

सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफी मागितली होती. इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती. जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो आहोत, असे तुषार गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांनी मांडलेले पुरावे सत्य आहेत. सावरकर एकेकाळी क्रांतिकारी होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. संपूर्ण आयुष्य ते इंग्रजांशी ईमानदार राहिले. हे सांगण्यात काहीच चुकीचे नाही. सत्य आपण सांगितले पाहिजे. सत्य सांगायला धाडस असले पाहिजे. (Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title: Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi | ‘Rahul Gandhi and Tushar Gandhi two worthless souls living on their great-grandfather’s Punai’ – Chitra Wagh

 

हे देखील वाचा :

Gold Rate Today | आज सोने-चांदीच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Uddhav Thackeray On Eknath Shinde Group | पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाची अक्कलच काढली; ‘हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि….’

Pune Crime | देवेंद्र फडणवीस यांची ट्विटरवर बदनामी करणार्‍यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Fifa Football World Cup 2022 | नको ‘त्या’ कारणांसाठी चर्चेत असलेला फुटबॉल विश्वचषक नव्या वादात; आयोजक करणार दारूबंदी?