Chitra Wagh | ‘मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं’ – चित्रा वाघ
मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Chitra Wagh | एकीकडे भाजप आणि ठाकरे सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याच्या दिसत आहेत. तर दुसरीकडे राजभवन आणि ठाकरे सरकार यांच्यातही धुसफूस होताना दिसते. साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्य सरकारला निर्देश देत दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, असं म्हटलं. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. ते पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवलं आहे. यावरुन भाजप आता सरकारवर टिकास्त्र सोडत आहे. त्यातच आता भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
मुख्यमंत्र्यांचं हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यावेळी बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, रोजच्या महिला अत्याचाराच्या घटना पाहाता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेऐवजी राज्यात महिला अत्याचाराची तिसरी लाट येतेय की काय, अशी स्थिती राज्यात येऊ लागतेय. यासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी भाजपाकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, इतक्या घटना होत असताना सर्वज्ञानी म्हणतात असं काय घडलंय अधिवेशन घ्यायला? तुमच्या तोंडाचा फेस निघतोय हे सांगताना की 5 वर्ष आमच्या सरकारला धोका नाही. याच्यापलीकडे तुम्ही बोलता काय? तुम्ही राज्यपालांना विरोधकांची थोबाडं फोडायला सांगता. सरकारचं थोबाड फोडा, आहे का तुमच्यात हिंमत. इतक्या घटना होत असताना हे सरकार षंढासारखं बसलंय, असं त्या म्हणाल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, राज्यातली एक महिला म्हणून मी अत्यंत व्यथित आहे. हे कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र वाटतच नाही. मुख्यमंत्री म्हणताना स्वत:ला कुटुंबप्रमुख म्हणतात. पण या कुटुंबप्रमुखाला हे माहिती आहे का की आपल्या नाकाखाली या महाराष्ट्रात काय घडतंय. या अशा बलात्काराच्या, महिला अत्याचाराच्या घटना रोज घडतायत. मग त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली तर त्यात गैर काय? तुमच्या राज्याच्या डीजींना बोलवा आणि या काळात राज्यात किती महिलांचं अपहरण झालं त्याची माहिती घ्या, असंही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटलं आहे.
web title: Chitra wagh maharashtra bjp leader chitra wagh targets cm uddhav thackeray on rape cases in state.
Kolhapur Anti Corruption | महापुराच्या मदतीसाठी लाच मागणारा शिपाई अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Comments are closed.