• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

by Namrata Sandhbhor
March 2, 2021
in क्राईम, मुंबई
0
chitra-wagh-1

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे. या मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ, वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, आता राठोडांसोबत त्यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे टीका करणाऱ्या भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी राजकारण जबरदस्त तापले होते. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रेश्मी करंदीकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. आता या प्रकारात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली होती. याशिवाय त्यांनी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही माहिती दिली. दरम्यान, व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत.

आवाज उठवणे गुन्हा आहे का?
“महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे आता गुन्हा झाला आहे का? असे मला विचारायचे आहे. जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती? स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची आणि हे तुम्ही बघितले मॉर्फ केलेले फोटो काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

माझा गुन्हा काय?
वाघ म्हणाल्या, मला सातत्याने हॅरेसमेंट आणि धमकीचे फोन येत आहेत. त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींसह सर्वांना पाठवत आहे. मी मुंबईच्या बाहेर जात असल्याने, जोपर्यंत मी गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही. मग तोपर्यंत मी हे सगळं सहन करायचं का? आणि माझा गुन्हा काय, तर जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवत आहे. हा माझा गुन्हा आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. याबाबत काळाचौकी पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या घरी जाऊन याबाबत त्यांचा जबाब नोंदवला आहे.

Tags: BJPBJP leader Chitra WaghBKC PolicecomplaintcrimeCyber DepartmentDeputy Commissioner of Police Reshmi KarandikarForest Minister Sanjay RathoreHome Minister Anil DeshmukhMumbai PolicepoliticsPooja Chavan suicide caseState governmentTelecom Minister Ravi Shankar Prasadगुन्हागृहमंत्री अनिल देशमुखतक्रारदूरसंचार मंत्री रविशंकर प्रसादपूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणपोलीस उपायुक्त रेश्मी करंदीकरबीकेसी पोलीसभाजप नेत्या चित्रा वाघभाजपामुंबई पोलिसमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराजकारणराज्य सरकारवनमंत्री संजय राठोडसायबर विभाग
Previous Post

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

Next Post

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

Next Post
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

pune-rain-in-hadapsar-3
ताज्या बातम्या

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर पंचक्रोशीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमालीची वाढत आहे. त्यामुळे कोरोनाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे....

Read more
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

chitra-wagh-1
क्राईम

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
0

...

Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा ठाकरे सरकारला सल्ला, म्हणाले – ‘2 आठवड्यांचा कडक Lokdown हा एकमेव पर्याय’

5 hours ago

सॅलरी मिळणार्‍या जवानांना शहीद म्हणणं योग्य नाही…लेखिकेची Facebook पोस्ट, करण्यात आली अटक

5 days ago

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा ‘प्लॅटफॉर्म’ तिकीटाबाबत मोठा निर्णय

3 days ago

जीवे मारण्याची धमकी देत जमीनीवर केला कब्जा, पोलीस ठाण्यातच जमीन मालकाला जमावाकडून बेदम मारहाण

6 days ago

गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

7 days ago

KKR च्या शुबमन गिलनं दाखवला ‘ट्रेलर’, जाणून घ्या नेमकं काय केलं

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat