नवी दिल्लीः वृत्तसंस्था
रशियामध्ये प्रत्येक व्यासपीठावर चिनी संरक्षणमंत्री वेई फेंगीपेक्षा राजनाथ सिंह यांच्यावर अधिक लक्ष लागले आहे. ज्या प्रकारे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे स्वागत केले गेले, त्यामुळे स्पष्ट झाले की, रशियाने चीनपेक्षा भारताच्या मैत्रीला अधिक महत्त्व दिले. रशियामध्ये सर्वत्र चिनी संरक्षणमंत्री वेई फेंगहे भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाठोपाठ चालताना पाहिले गेले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंगहे एकत्र रशियन सैन्याच्या स्मारकात पुष्प अर्पण करण्यासाठी आले असता, रशियन लष्करी अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घेरलेले दिसून आले. पण चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगी यांच्याकडे फारसे लक्ष दिलेले दिसले नाही. पाकिस्तानी जनरल देखील वेई बरोबर चालत होते. पण त्यांच्याकडे रशियन अधिकाऱ्यांचेही लक्ष नव्हते. रशियन सैन्य अधिकार्यांचे संपूर्ण लक्ष राजनाथ सिंह यांच्यावर होते.
चिनी संरक्षणमंत्र्यांचा रशियामध्ये अपमान?
जेव्हा जेव्हा रशियामध्ये राजनाथ सिंह यांचा चीनच्या संरक्षणमंत्र्याशी सामना झाला तेव्हा पल्ला भारताचाच भारी होता. याचा एक पुरावा म्हणजे एससीओच्या बैठकीपूर्वीचा एक कार्यक्रम. बैठकीपूर्वी राजनाथ सिंह यांच्यासह एससीओचे सर्व संरक्षण मंत्री रशियन सैन्याच्या सर्वात मोठ्या चर्चमध्ये गेले. येथेही चीनच्या संरक्षणमंत्र्यांकडे दुर्लक्ष केले गेले.
यावेळी रशियन संरक्षणमंत्री सतत राजनाथ सिंह यांच्यासोबत फिरताना दिसले. एवढेच नव्हे तर रशियाचे संरक्षणमंत्री केवळ राजनाथ सिंह यांच्याशीच बोलताना दिसले. राजनाथ सिंह आधीच चीनच्या संरक्षणमंत्र्यांकडे दुर्लक्ष करत होते. रशियन संरक्षणमंत्र्यांनीही चीनकडे लक्ष दिले नाही. येथे बरेच एससीओ संरक्षण मंत्री उपस्थित होते. पण विशेष बाब म्हणजे चीन शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) चे संस्थापक सदस्य आहे. सन 2017 मध्ये भारत त्याचा सदस्य झाला. असे असूनही, रशियाचे संरक्षण मंत्रीचे लक्ष केवळ भारताच्या संरक्षणमंत्र्यावरच राहिले. रशियामध्ये प्रत्येक टप्प्यावर राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षणमंत्र्यांपासून दूर राहावे, हे लक्षात ठेवले.