बहुजननामा ऑनलाईन – चीनी मोबाइल फोन निर्माता कंपनी विवो उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आपले नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापित करेल. ही फॅक्ट्री १६९ एकरामध्ये असणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआरमधील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.
फोन उत्पादन क्षमता दुप्पट केली जाईल
विवो इंडियाचे संचालक (ब्रॅण्ड स्ट्रॅटेजी) निपुण मार्या म्हणाले की, नोएडाच्या मॅन्यूफॅक्चरिंग युनिटमध्ये एका वर्षात सुमारे २५ दशलक्ष स्मार्टफोन तयार करण्याची क्षमता असेल. नोएडा येथे फॅक्ट्री स्थापन केल्यानंतर कंपनीची स्मार्टफोन उत्पादन क्षमता जवळपास दुप्पट होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कंपनी 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल
सध्या कंपनीचे बहुतेक सर्व फोन भारतात बनविलेले स्मार्टफोन आहेत. विवोच्या योजनेनुसार, भारतातील उत्पादन क्षमता सुमारे 4000 कोटी खर्चापेक्षा जास्त वाढेल. मार्याने स्मार्टफोन Vivo S1 लॉन्च करताना म्हणाले की, त्यांची S सीरीज मेड इन इंडिया आहे.
Vivo S1 ची विक्री सुरू
Vivo S1 स्मार्टफोन आजपासून म्हणजेच गुरुवारपासून देशभरातील किरकोळ दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, हे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन देखील खरेदी केले जाऊ शकते. विवो इंडिया स्टोअर, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट १४ ऑगस्टपासून फोनची विक्री सुरू करणार आहेत. विवो S1 चे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेले विवो S1 व्हेरिएंट पुढील महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असतील.