Chinchwad-Khadakwasla Assembly Election 2024 | चिंचवड आणि खडकवासल्यामध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला विरोध; उमेदवार बदलला तरच पक्षाचे काम करणार, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा इशारा

पुणे: Chinchwad-Khadakwasla Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा करण्यात आली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप (MVA Seat Sharing Formula) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. (mahayuti Seat Sharing Formula)
एकीकडे जागावाटपाबाबत चर्चा सुरु असताना भाजपच्या विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत विरोध पाहायला मिळत आहे. चिंचवड विधानसभेत जगताप कुटुंबियांच्या घराणेशाही विरोधात भाजपातील माजी नगरसेवक एकवटले आहेत. जगताप कुटुंबियांना भाजपकडून उमेदवारी देण्यास या नगरसेवकांचा विरोध आहे.
या मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (MLA Ashwini Jagtap) यांना भाजपकडून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आणि त्या सध्या विधानसभेवर चिंचवड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अश्विनी जगताप किंवा त्यांचे दीर शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र भाजपच्याच काही माजी नगरसेवकांनी बैठक घेत चिंचवड विधानसभा क्षेत्रातील जगताप कुटुंबीयांच्या घराणेशाहीला विरोध केला आहे.
चिंचवड विधानसभा क्षेत्रात भाजपकडे भरपूर इच्छुक उमेदवार असून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी काही माजी नगरसेवक करत आहेत. यात भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, शत्रुघन काटे, राम वाकडकर आणि माधुरी कुलकर्णी अशा काही प्रमुख नगरसेवकाचा विरोध आहे.
त्याचप्रमाणे पुण्यात ८ विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात (दि.१५) बैठक पार पडली. या बैठकीत खडकवासल्यात उमेदवार बदला अशी मागणी १० नगरसेवकांनी केली आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या बैठकीत भाजपने यावेळी उमेदवार बदलला पाहिजे, तरच ही जागा आपण जिंकू अशी मागणी काही माजी नगरसेवकांनी केली. (BJP Candidates For Assembly Elections 2024)
त्यातील काही इच्छुकांनी आमच्या पैकी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही पूर्ण ताकदीने काम करू असे सांगितले. तर काहींनी पक्ष जो उमेदवार देईल त्यांचे काम करू असे सांगितले. दरम्यान पक्षाच्या नेत्यांची या माजी नगरसेवकांची मते ऐकून घेऊन तुमच्या भावना पुढे कळवू असे आश्वासन दिले.
Comments are closed.