बहुजननामा ऑनलाईन टीम : चीन त्याच्या वायव्य भागात राहणाऱ्या उइगर मुस्लिमांवर दडपशाहीच्या नवीन पद्धती वापरत आहे. चीन उइगर मुसलमानांसाठी “जोडी बनवा आणि कुटुंब बनवा” हा कार्यक्रम चालवित आहे. त्याअंतर्गत तो चिनी पुरुष अधिकाऱ्यांना त्या महिलांच्या घरी पाठवून, अनैतिक संबंध बनविण्यास भाग पडले जाते. या प्रकाराला जगभरातील हद्दपार उइगर मुस्लिम विरोध दर्शवत आहेत, अपमानित असल्याचे म्हणत आहेत. मात्र चीन या प्रकाराला बरोबर ठरवत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिनजियांग परिसरातील उइगर मुस्लिम या प्रकाराला बळी पडत आहेत. पण आतापर्यंत त्याबद्दल कुठेही वाच्यता करण्यात आलेली नव्हती.
“जोडी आणि एक कुटुंब व्हा” कार्यक्रम चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने आणला आहे. यासाठी पक्ष केडरमधील एक लाख अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्यांना “रिलेटिव्ह” जाते. जे एकट्या उइगर मुस्लिम महिलेच्या घरी पूर्ण अधिकाराने जातात. एक ‘रिलेटिव्ह’ अर्थात चिनी अधिकारी अनेक उइगर मुस्लिम महिलांच्या घरांना जाऊ शकतो. हे पुरुष स्त्रियांसमवेत किमान सहा दिवस राहतात. ही अशी घरे आहेत ज्यांच्या पुरुष सदस्यांना चीनच्या छावण्यांमध्ये पाठवले गेले आहे. या छावण्या तुरूंगासारख्याच आहेत. त्यामुळे या भागातील घरात एकतर महिला किंवा लहान मुले शिल्लक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे दहा लाख उइगर मुस्लिम पुरुषांना छावणीत ठेवण्यात आले आहे.
दरम्यान धर्माप्रती कट्टर आणि वेगळ्या राजकीय वृत्तीमुळे उइगर मुस्लिमी देशासाठी धोकादायक असल्याचा चीनचा विश्वास आहे. त्यामुळे चीनने यापूर्वीही मशीदी मोडून काढणे, उर्दू किंवा उइगर भाषेवर बंदी घालणे आणि उइगर मुलांना वेगळे करणे यासह अनेक पावले उचलत आहेत. तसेच सहा दिवस मुक्काम करत असताना संबंधित अधिकारी उइगर महिलेवर बारीक नजर ठेवतो. तो तिला सर्व प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. यावेळी, तो सर्व प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. आणि स्त्रीला या प्रश्नांची उत्तरे देणे भाग आहे. निषेध करू शकत नाहीत. ते यावेळी ते अभ्यास सत्रे व इतर कामेही करतात. ते चिनी भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर तो त्या महिलेसोबत फोटो काढुन तो सोशल मीडियावर कोणत्याही परवानगीशिवाय पोस्ट करतो. दरम्यान ह्यूमन राईट्स वॉच संघटनेने याचा विरोध करत चीनी अधिकाऱ्यांचे हे कृत्य उघडपणे मूलभूत हक्कांचे उल्लंघन करीत आहे, त्या मुळे या क्षेत्रात बराच असंतोष व्यक्त केला जात आहे.
Visit : bahujannama.com