नवी दिल्ली : महामारीच्या कारणांचा शोध घेत असलेल्या डब्ल्यूएचओच्या टीमला चीनने सुरुवातीच्या कोविड-19 संसर्गाच्या प्रकरणांचा रॉ डेटा म्हणजे सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे. डब्ल्यूएचओ टीमचे सदस्य आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डोमनिक डॉयर यांनी सांगितले की, कोविड-19 चा प्रसार आणि महामारी पसरण्याबाबत तपास करत असलेल्या टीमने चीनकडून वुहान शहरात डिसेंबर 2019 मध्ये सर्वप्रथम आलेल्या संसर्गाच्या 174 प्रकरणांसह अन्य प्रकरणांची सविस्तर माहिती मागितली होती. परंतु, चीनने केवळ संक्षिप्त माहितीच आम्हाला दिली आहे. डोमनिक यांनी सांगितले की, अशाप्रकारच्या रॉ डेटाला ’लाइन लिस्टिंग्स’ म्हणतात.
काय म्हणाले, डब्ल्यूएचओ एक्सपर्ट
त्यांनी सांगितले की, यामध्ये संक्रमित व्यक्तींची नावे नसतात. परंतु, त्यांना विचारलेले सर्व प्रश्न आणि उत्तरे असतात. रूग्णाच्या उत्तरांचे विश्लेषण सुद्धा केले जाते. डोमनिक यांनी सिडनीहून शनिवारी व्हिडिओ कॉलद्वारे हे सर्व सांगितले. ते या महामारीच्या विषयात तपास करत असल्याने क्वारंटाइनमध्ये आहेत.
महामारीच्या मुळापर्यंत पोहचणे अतिशय आवश्यक
रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, डोमनिक यांनी म्हटले की, ही सुरुवातीची कोविड संसर्गाच्या प्रकरणांची माहिती महामारीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. सुरुवातीच्या 174 प्रकरणांपैकी केवळ निम्मे रूग्ण वेट मार्केटच्या संपर्कात आले होते. वुहानमध्ये समुद्रातील जीव मिळण्याचे सेंटर असलेले हे मार्केट आजपर्यंत बंद आहे. याच बाजारात पहिल्यांदा कोरोना व्हायरसचे अस्तित्व नोंदले गेले होते. आम्ही आता काही सांगू शकत नाही परंतु हे आकडे मिळणे खुप जरूरी आहे. डब्ल्यूएचओ टीमने सांगितले की, चीनने त्यांना मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगले आकडे दिले आहेत.
पुढील वर्षी संक्षिप्त रिपोर्ट देणार
डब्ल्यूएचओने सांगितले की, पुढील आठवड्यात संक्षिप्त रिपोर्ट जारी केला जाईल. चीनमध्ये महामारी पसरण्याचे कारण शोधण्यासाठी टीम जानेवारीमध्ये पोहचली होती. कोविड संसर्गासाठी वापरण्यात येणार्या मानकांतर्गत तिथे घालवलेल्या 4 आठवड्यांपैकी दोन आठवड्यात मोजक्याच संस्था आणि लोकांशी भेट घडवण्यात आली. तिथे टीमला समजातील लोकांशी संपर्क साधण्यास मनाई होती.