बहुजननामा ऑनलाइन टीम : आपण या जगात दिवस आणि रात्रीमध्ये फरक पाहू शकतो याचे एकच कारण सूर्य आहे ज्यामुळे केवळ मनुष्यांनाच नव्हे तर वनस्पती आणि झाडे जगण्यासाठी ऊर्जा मिळते, परंतु आपणास हे माहित आहे का की चिनी शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार केला गेला आहे. हा सूर्यसुद्धा खऱ्या सूर्याप्रमाणे प्रकाश देतो. चीनने विकसित केलेला परमाणु फ्यूजनच्या मदतीमुळे दहा पट अधिक स्वच्छ ऊर्जा निर्माण करू शकतो.
चीनच्या एका समाचार एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने नुकतेच याचे काम पूर्ण केले असून २०२० पर्यंत हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. चिनी कृत्रिम सूर्याला HL-2M असे नाव देण्यात आले असून ते चीनमध्ये तयार केले गेले आहे. चीनचे नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनने साऊथ वेस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्ससोबत मिळून हे काम केले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते पूर्ण सक्रिय झाल्यानंतर रिऍक्टर सूर्याच्या मानाने 13 पट अधिक तापमानापर्यंत पोहचू शकतो. जो जवळजवळ 200 मिलियन डिग्री सेल्सियस पर्यंत पोहचू शकते. सूर्याचे जास्तीत जास्त तापमान 15 मिलियन डिग्री सेल्सियस एवढे असते. याचे एवढे गरम होण्याचे कारण परमाणू फ्युजन आणि परमाणू उर्जाला फ्युज करण्यासाठी प्रयत्न करतात आणि यामध्ये एक टन ऊर्जा उत्पन्न होते. पृथ्वीवर परमाणू यंत्रणेमध्ये नेहमी ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी विभाजनाचा पर्यायच निवडला जातो. परमाणू वास्तवातील सूर्याप्रमाणे असतो आणि हाच चीनच्या एचएल 2 एमच्या निर्मितीचा आधार आहे.
Visit : bahujannama.com