नवी दिल्ली वृत्तसंस्था – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या म्यानमार दौर्याच्या दरम्यान फेसबुक वर त्यांच्या नावाचे बर्मी भाषेतून इंग्रजीमध्ये चुकीचे भाषांतर झाल्याने फेसुबकने शनिवारी माफी मागितली. म्यानमारची राजधानी नेपीताचा जिनपिंग यांनी दोन दिवसीय दौरा केला. कोणत्याही चीनी राजकीय नेत्याने मागील दोन दशकात म्यानमारचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
म्यानमारच्या फेसबुक पेजवर स्वयंचलित भाषांतर व्यवस्थेत शी जिनपिंग यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख झाला होता, यामुळे वाद निर्माण झाला होता. फेसबुक पोस्टमध्ये बर्मी भाषेतून इंग्रजी भाषांतरात शी जिनपिंग यांचे नाव ‘मिस्टर शिटहोल’ असे चूकीचे लिहिले गेले होते.
शी जिनपिंग चे भाषांतर ‘शिटहोल’
म्यानमारचे नेते आंग सान सू ची यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर सर्वात जास्त चुका आढळून आल्या. शनिवार करण्यात आलेल्या भाषांतरीत पोस्टमध्ये म्हटले होते की, चीनचे राष्ट्रपती ‘मिस्टर शिटहोल’ सायंकाळी चार वाजता पोहचले आहेत. यात पुढे लिहिले होते, चीनचे राष्ट्रपती ‘श्री शिटहोल’ यांनी प्रतिनिधि सभेत एका अतिथी दस्तावेजावर हस्ताक्षर केले.
फेसबुकने मागितली माफी
फेसबुकने म्हटले आहे की, हे अतिशय वाईट आहे. तांत्रिक गडबडीमुळे असे झाले आहे. आम्ही तांत्रिक समस्या दूर केली आहे, ज्यामध्ये शी जिनपिंग यांच्या नावाचे फेसबुकवर चुकीचे भाषांतर झाले होते.