नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जसजसा कोरोनाचा फैलाव देशात होत आहे तशी लोकांमध्ये भीतीही वाढत आहे. याचाच परिपाक म्हणून आपल्या समोर येणाऱ्या दररोजच्या बातम्या असतील. अशीच एक घटना ओडिशामध्ये घडली आहे. ओडिशामध्ये जे झालं आहे ते ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. झालं असं ओडिशामधील मलकानगिरी भागात कोरोना होऊ नये म्हणून 10-12 वर्षांच्या मुलांना चक्क देशी दारू पाजली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मालकानगिरीमधील परसनपाली या गावात 50 पेक्षा जास्त लहान मुलांना गावकऱ्यांनी दारू पाजल्याची घटना घडली आहे. त्यांना वाटतं की ‘सालपा'(देशी दारू) पाजल्याने लहान मुलांना कोरोनाची लागण होणार नाही.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लहान मुलांना बसवून दारू पाजत असल्याचं दिसतंय. यात सोशल डिस्टन्स नाहीतच पण कोणीही मास्क देखील घातला नाहीये. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या गावकऱ्यांच्या कृत्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. डॉक्टरांच्या मते दारू पिल्याने कोरोना दूर होतो ही एक फक्त अफवा आहे यावर कोणीही विश्वास ठेवू नये. अशाप्रकारे लहान मुलांना दारू पाजणे हा गुन्हा आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवून काहीही करू नये असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.