नवी दिल्ली वृत्तसंस्था – मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविली असून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर २३ जूलै रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ सालच्या निवडणूकीमध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपविली होती. त्यांनी या प्रतिज्ञापत्रात फसवणूक आणि मानहानीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती दिलेली नाही. असा आरोप अड. सतीश उके यांनी केला असून देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे.
Supreme Court posts for final disposal on July 23 on a plea against Maharashtra CM Devendra Fadnavis seeking annulment of his election to the assembly as he had allegedly not made full disclosure of criminal cases pending against him in affidavit filed along with nomination form. pic.twitter.com/eVL4gKYfL4
— ANI (@ANI) July 3, 2019
त्यांनी दोन्ही गुन्हे लपविल्याने त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. यापुर्वी उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी दिलासा दिलेला आहे.