बहुजननामा ऑनलाईन टीम – बिलासपूरमध्ये छातीत गोळी लागूनही प्रियकराने आपल्या प्रेयसीला गुंडापासून वाचवले. या युवकाच्या दुचाकीचे दोन्ही टायर्स देखील पंक्चर झाले, परंतु त्याने धीर सोडला नाही आणि जवळच्या रुग्णालयात पोहोचला. विश्वजित परीदा (वय २२) असे या मुलाचे नाव असून शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.
हे जोडपे उस्लापूर रेल्वे स्थानकाजवळील निर्जन ठिकाणी गेले होते. काही गैरप्रकार घडेल या भीतीने ते दोघे तेथून निघून निघाले असता तेव्हा एक मास्क लावलेली व्यक्ती तिथे पोहोचली.
मुलीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, त्यानं पिस्तूलाची भीती दाखवत जवळील तलावाजवळ येण्यास सांगितले. काही अंतर चालल्यानंतर त्या दोघांनी त्याला विरोध केला. त्यानंतर त्या व्यक्तीं तरूणाच्या छातीवर गोळी झाडली. त्या युवकाने आपल्या मैत्रिणीचा हात धरला आणि दुचाकीकडे पळत सुटला. काही अंतर त्या मुखवटा घातलेल्या व्यक्तीने त्या दोघांचा पाठलाग करुन अंधारात गायब झाला.
मुलीच्या वक्तव्यावर पोलिसांनी सांगितले की, मुखवटा घातलेला व्यक्ती लुटण्याच्या उद्देशाने आला असावा. बिलासपूरचे एसपी प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले की, आयपीसीच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.