मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सुभाषचंद्र बोस हे आपल्या सहकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन कसं पटवून देतात हे यात सांगितलं गेलं आहे.
ह्या हिंदभूमीवरील स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे शिवछत्रपती… कालही, आजही आणि उद्याही! #रयतेचाराजा #शिवछत्रपती #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #स्वातंत्र्यसूर्य pic.twitter.com/WO0OVUzBZB
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 19, 2021
व्हिडीओ शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये मनसेनं लिहिलं की, ह्या हिंदू भूमीवरील स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे शिवछत्रपती… कालही, आजही आणि उद्याही ! असं म्हणत शिवरायांना अभिवादन केलं आहे.
मनसेनं शेअर केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.