Chhatrapati Sambhaji Nagar Incident | संभाजीनगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?, पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितला घटनाक्रम

छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन – Chhatrapati Sambhaji Nagar Incident | छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनासह अनेक खासगी गाड्यांची तोडफोड करुन काही गाड्या जाळण्यात आल्या. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) निर्माण झाले आहे. सध्या याठिकाणी तणावपूर्ण शांतता असून रात्री नेमकं काय घडलं, याबाबत पोलीस आयुक्त निखील गुप्ता (CP Nikhil Gupta) यांनी माहिती दिली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रात्री नेमकं काय घडलं?
बुधवारी रात्री अकराच्या सुमारास किराडपुरा (Kiradpura) भागातील राम मंदिराजवळ (Ram Mandir) तरुणांच्या दोन गटात किरकोळ भांडण झाले. त्यानंतर एका गटातील तरुण तेथून निघून गेले. परंतु, काही वेळाने त्या ठिकाणी गर्दी जमण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या एका तासानंतर मोठ्या संख्येने लोक जमण्यास सुरुवात झाली. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली, असे पोलीस आयुक्त निखील गप्ता यांनी सांगितले.
गुप्ता पुढे म्हणाले, दगडफेक सुरु झाल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) प्रयत्न केला. परंतु समाजकंटकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांना जमावाला रोडवर थांबवणे शक्य झाले नाही.
घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर माझ्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घनसास्थळी धाव घेतली. त्यानंतर आम्ही पोलीस बळाचा वापर करुन तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. एक ते दीड तास हा सर्व प्रकार सुरु होता. त्यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगड फेक केली. पोलिसांच्या आणि काही खासगी गाड्या त्यांनी जाळल्या. पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास आम्ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणा आणली.
यावेळी निखील गुप्ता यांना इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी पोलीस उशीरा आल्याच्या आरोपाबाबत विचारण्यात आले.
यावर बोलताना गुप्ता म्हणाले, अशावेळी नेमकी काय परिस्थिती आहे? ती समजून घेणे गरजेचे असते.
काल रात्री समाजकंटकांनी या परिसरातील लाईट फोडल्याने सगळीकडे अंधार झाला होता.
त्यामुळे परिस्थिती समजून घेऊनच आम्ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तरुणांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे.
या घटनेसंदर्भात कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच सर्वपक्षांच्या नेत्यांना बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chhatrapati Sambhaji Nagar Incident | sabhajinagar police commissioner nikhil gupta told about last night incident in kiradpura
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | ‘मुंबादेवी’ परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Comments are closed.