येवला : बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप – शिवसेना युतीमध्ये तसेच काँगेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीमध्ये जागावाटपा संदर्भात संभ्रम सुरु आहे. त्यात भाजप – शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या जोरदार इनकमिंगमुळे पक्षातील पदाधिकारी अजूनच पेचात पडले आहे. दरम्यान ,माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र, ही निवडणूक ते पक्षातून लढणार याबाबाबत बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला आता
अजूनच उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकी तोंडावर अनेक नेते भाजप – शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. तरी मंगळवारी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विंचूर येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवली होती. तसेच गणपती उत्सवानिमित्त छगन भुजबळ यांनी अनेक गणेश मंडळांना भेट दिली. त्यावेळी येवला येथील शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती मंडळालाही त्यांनी भेट दिली. उपस्थित शिवसैनिकांनी देखील त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अश्या घोषणाबाजी करत भुजबळांचे जंगी स्वागत केले. तसेच भुजबळांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा तसेच येवल्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला. यावर बोलताना भुजबळांनी मी येवल्यातूनच विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर केले.
आगामी विधानसभा निवडणुसाठी शिवसेनेकडून येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघात उमेदवारीसाठी शिवसेनेतील इच्छुक उमेदवार संभाजी पवार आणि रुपचंद भागवत प्रयत्न करत आहेत. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी ते दोघेही मातोश्रीच्या पायऱ्या झिजवत आहेत. तसेच माजी आमदार कल्याणराव पाटील यांनीदेखील येवला लासलगाव येथून उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यातच आता येवला येथील शिवसैनिकांनी भुजबळांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी केलेल्या आग्रहामुळे स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना आपली उमेदवारी सोडावी लागणार असल्याचे चित्र दिसून देत आहे.
या आधीही छगन भूजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र भुजबळांनी त्याला नकार देत राष्ट्रवादीत असल्याचे सांगितले. परंतु भुजबळ यांच्या शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती मंडळाच्या भेटीमुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्यामुळे आता छगन भुजबळच हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान , विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार वैभव पिचड, मधुकरराव पिचड, आमदार दिलीप सोपल, आमदार संदीप नाईक, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील असे अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजप- शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, भास्कर जाधव आणि पवारांचे नातेवाईक पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी