मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचा उल्लेख झाशीची राणी असा केला होता. भुजबळांच्या या विधानानंतर संतप्त झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी भुजबळ जामीनावर सुटले आहेत. अजून निर्दोष सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल, अशी धमकीच दिली होती. पाटलांच्या या धमकीवर आता छगन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दुर्दैवाने वारंवार भाजपला पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून पाटील यांनी थोड सांभाळून बोललं पाहिजे, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, भुजबळ पुतण्याचा जामीन मिळवण्यासाठी विनवणी करत होते. पण माझा पुतण्या म्हणजे कोण? समीर भुजबळला माझ्या दोन महिने आधी जेलमध्ये टाकल होते. मग तो कसा जाईल यांच्याकडे?, तसेच माझा मुलगा पंकजलाही समन्स बजावल्याने तोही कधी त्यांच्याकडे गेला नाही. मग यांनी कोणता पुतण्या शोधून काढला? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. ‘मला अटक होण्याच्या दोन महिने आधी अटक होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अनिल देशमुखाचे सांगितलं आणि परब यांचे नाव घेत आहेत. म्हणून हे घडवून आणत असल्याची शंका भुजबळांनी व्यक्त केली आहे.