मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Changes From 1st August | रिझर्व्ह बँकेने बॅंकिंग (Reserve Bank of India) व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. आयसीआयसीआय बँकेनेही (ICICI Bank) त्यांच्या काही नियमांमध्ये बदल केले आहे त्याशिवाय घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्येही 1 ऑगस्टपासून बदल (Rules Changes From 1st August) होणार आहे.त्यामुळे 1 ऑगस्टपासून बदललेल्या नियमांमुळे तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1 ऑगस्टपासून झालेले बदल
आता बँक हॉलिडेच्या दिवशीही मिळणार पगार
नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (National Automated Clearing House) आठवड्याच्या सातही दिवस उपलब्ध राहणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने (RBI) केली आहे. त्यामुळे पगार, पेन्शन, व्याज, डिव्हिडेंट इत्यादींचा व्यवहार एनएसीएचच्या (NACH) माध्यमातून होणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट 2021 पासून रविवार किंवा अन्य कुठलाही बँक हॉलिडे (Bank Holiday) असला तरी तुमचा पगार, पेंन्शन, डिव्हिडंट आणि इंट्रेस्टचे पेमेंट अडकणार नाही.
एटीएमच्या शुल्कात वाढ
एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फीज (Increase ATM charges) रिझर्व्ह बँकेनं वाढवली आहे. इंटरचेंज फीज 17 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ती 15 रुपये होती. तर नॉन बिगर वित्तीय व्यवहारांसाठी (non-financial transaction) आकारण्यात येणारी फी 5 रुपयांवरून 6 रुपये केली आहे. एखादा ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून 5 वेळा निशुल्क व्यवहार करू शकतो. यामध्ये आर्थिक आणि बिगर आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएमचाही निशुल्क वापर करू शकतात.
आयसीआयसीआय बँकेमधील हे नियम बदलणार
आयसीआयसीआय बँक हि देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. या बँकेमध्येही 1 ऑगस्टपासून अनेक मोठे बदल होणार आहे. 1 ऑगस्टपासून या बँकेतून पैसे काढणे महागणार आहे. तसेच चेकबूकच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. ग्राहकांना चार ट्रान्झॅक्शनची सेवा मोफत दिली जाते. तसेच चार वेळा पैसे काढल्यानंतर तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. रेग्युलग सेव्हिंग अकाउंटवर (Regular savings account) आयसीआयसीआय बँक दर महिन्याला चार कॅश ट्रान्झॅक्शन फ्री देते. फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 150 रुपये द्यावे लागतील.
आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक आपल्या होम ब्रँचमधून -ऑगस्टपासून एक लाख रुपये काढू शकतील यापेक्षा अधिक व्यवहार झाल्यास प्रति एक हजार रुपयांवर 5 रुपये द्यावे लागतील. होम ब्रँच शिवाय अन्य कुठल्याही ब्रँचमधून पैसे काढल्यास दररोज 25 हजार रुपयांपर्यंत कॅश काढण्यावर शुल्क आकारले जाणार नाही. त्यानंतर एक हजार रुपये काढण्यासाठी 5 रुपये द्यावे लागतील
चेकबुकवर लागणार एवढा चार्ज
25 पानांचे चेकबूक फ्री असेल, त्यानंतर तु्म्हाला 20 रुपये प्रति 10 पानांच्या अतिरिक्त चेकबुकसाठी द्यावे लागतील.
सिलेंडरच्या नवे दर होणार जारी
एलपीजी सिलेंडरच्या (LPG cylinder) किमतींमध्ये १ ऑगस्टपासून बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या किमती जारी होत असतात.
Web Title :- Changes From 1st August august 1 there will be change these rules daily life which will have direct effect common man
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update