नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या चांद्रयान 2 मिशनवर जगभराचे लक्ष लागलेले आहे. लँडर विक्रम सोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सतत इस्रोकडून केले जात आहेत. परंतु इस्रोला यात कोणतंही यश मिळत नाही. आता विक्रमशी संपर्क करण्याची शेवटची आशा एक्स बँड(X- Band) आहे.
X-Band वर एक नजर
चांद्रयान 2 संबंधित एका शास्त्रज्ञाने सांगितले की, “असे थोडेच चॅनल आहेत ज्यांच्या द्वारे लँडर विक्रम आणि ग्राऊंड स्टेशन सोबत संपर्क साधला जाऊ शकतो. ते आहे एक्स बँड(X-Band). याचा वापर साधारणपणे रडार, सॅटेलाईट कम्युनिकेशन आणि कम्प्युटर नेटवर्कसाठी केला जातो.
कर्नाटकच्या गावातून केला जातोय संपर्क
विक्रमसोबत संपर्क साधण्यासाठी इस्रो कर्नाटकातील एक गाव बयालालुमधून 32 मीटरच्या अँटीनाचा वापर करत आहे. याचं स्पेस नेटवर्क सेंटर बंगळुरूमध्ये आहे. ऑर्बिटरच्या मदतीने विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्रो प्रयत्न करत आहे. लँडरचे कोणतेही नुकसान झालेले नाही. कोणतीही तोडफोड झालेली नाही. लँडर विक्रम सोबत संपर्क साधण्याचा शक्य तो प्रत्येक प्रयत्न इस्रोकडून केला जात आहे.
इस्रोकडे केवळ 10 दिवस
विक्रमचे मिशन चंद्र पूर्ण करण्यासाठी इस्रोकडे फक्त 10 दिवस बाकी आहेत. 21 सप्टेंबर पर्यंत इस्रो लँडर विक्रमसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. यानंतर लुनर नाईटची सुरुवात होणार आहे. त्यामुळे स्थिती एकदम बदलून जाईल. 14 दिवसांपर्यंतच विक्रमला सुर्यप्रकाश मिळणार आहे. लँडरमधील रोवर प्रज्ञान लँडिंगनंतर चंद्रावर उतरणार होता. प्रज्ञान केवळ 14 दिवसच काम करणार होता.