बहुजननामा ऑनलाईन – भारताचेच नव्हे तर संपुर्ण जगभरातील लोकांचे लक्ष ज्या चांद्रयान २ कडे लागले होते त्या चंद्रयान २ चा लँडर विक्रम चंद्रावर उतरण्यापूर्वी फक्त २.१ किमी अंतरावर असताना त्याचा इस्रोशी संपर्क तुटला. विक्रमचा संपर्क का तुटला किंवा तो क्रॅश तर झाला नाही ना याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. तरी चंद्रयान -२ मिशनसाठी वापरण्यात आलेले ९७८ कोटी रुपये किंमतीचे सर्व काही संपलेले नाही. असे इस्त्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या (इस्रो) अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवरुन याबाबत माहिती दिली. “लॅन्डर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर हे मिशनचे फक्त पाच टक्के असलेला भागाचे नुकसान झाले आहे. उरलेला ९५ टक्के चांद्रयान २ चा ऑर्बिटर अजूनही यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. एक वर्ष मोहिमेचा कालावधी असलेला ऑर्बिटर चंद्राची अनेक छायाचित्रे इस्रोला पाठवू शकतो. ऑर्बिटर लँडरची छायाचित्रेही घेऊ शकतो आणि पाठवू शकतो, जेणेकरून त्याची स्थिती जाणून घेण्यास मदत होईल. चंद्रयान -२ अंतराळ यानाचे ऑर्बिटर (२३७९ किलो, आठ पेलोड), विक्रम (१४७१ किलो, चार पेलोड) आणि प्रज्ञान (२७ किलो, दोन पेलोड) असे तीन विभाग आहेत.
विक्रम २ सप्टेंबर रोजी ऑर्बिटरपासून वेगळा झाला होता. चांद्रयान २ ला २२ जुलै २०१९ रोजी भारताच्या अवजड रॉकेट जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन-मार्क 3 (जीएसएलव्ही एमके 3) च्या माध्यमातून अवकाशात सोडण्यात आले होते.
विक्रम लॅंडरशी संबंध तुटल्यानंतर मोहिमेशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ निराश झाले होते. मात्र त्यांना प्रोत्साहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. काही नवीन शोध, नवीन तंत्रज्ञान आपल्याला प्रेरित करतात आणि यातूनच आपले भविष्यातील यश निश्चित होत असते. जर ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक कोणी असेल तर ते विज्ञान आहे. विज्ञानात अपयश नसते. त्यात फक्त प्रयोग आणि पयत्न असतात.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत