नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महत्त्वाकांक्षी मिशन चांद्रयान 2 शुक्रवारी रात्री उशीरा चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 किलोमीटर दूर असतानाच रस्ता भटकलं. याची शंका आधीच व्यक्त केली गेली होती. विक्रम लँडरचे चंद्रावर पोचण्याचे 15 मिनिट खूपच महत्त्वाचे असतील असे सांगण्यात आले होते. रात्री 1 वाजून 38 मिनिटांनी विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर आणण्याची प्रक्रिया सुरु केली गेली. परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर पोचण्याच्या 2.1 किमीआधीच त्याचा इस्रोशी संपर्क तुटला. आताही विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क होण्याच्या आशा आहेत. असे झाले तर हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल.
लँडिंगची प्रक्रिया 1 वाजून 38 मिनिटांनी सुरु करण्यात आली. केवळ 2 किमीचं अंतर बाकी होतं. 1 वाजून 44 मिनिटांनी लँडर विक्रमने रफ ब्रेकींगचा टप्पा पार केला. यानंतर शास्त्रज्ञांनी याचा वेग कमी करण्यास सुरुवात केली. 1.49 ला त्याचा वेग कमी झाला. रात्री 1.52 मिनिटांनी चंद्रावर उतरण्याच्या शेवटच्या टप्प्यात चांद्रयान 2 पोचलं होतं. याचवेळी त्याचा पृथ्वीवरील स्टेशनसोबतचा संपर्क तुटला.
असे सांगितले जात आहे की, इस्रोच्या कंट्रोल रुममध्ये असलेल्या स्क्रीनवरील आकडे अचानक थांबले. कोणालाच कळेना काय झाले आहे. इस्रोचे प्रमुख सिव तिथे बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आले त्यांनी याची माहिती मोदींना दिली आणि बाहेर निघून गेले. यानंतर इस्रोने कंट्रोल रूममधील लाईव्ह स्ट्रीमिंगही बंद करण्यात आली.
- विषयक वृत्त आरोग्यदात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत