मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Chandrasekhar Bawankule | भारतीय जनता पार्टीकडून (BJP) त्यांना पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली. असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. मी ही ऑफर स्विकारली असती तर, महाविकास आघाडी (MVA) सरकार कधीच कोसळले असते. असा दावा काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांकडून करण्यात आला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अनिल देशमुखांवर जोरदार निशाणा साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) दोन दिवस आधी नागपुरात काय झालं होतं, ते जर मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील. बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले की, अनिल देशमुख हे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते काही निर्दोष सिद्ध झाले नाहीत, किंवा कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारची क्लीन चीट दिलेली नाही.’ असा इशारा यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुख यांना दिला.
बावनकुळे पुढे म्हणाले की, ‘ अनिल देशमुख हे जामीनावर बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना थोडा संयम ठेवावा. न्यायालयाने त्यांना केवळ जामीन दिला आहे. क्लीन चीट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक आणि संयमाने बोलावं अशी मी त्यांना विनंती करेन. त्यांना कोर्टाने जामीन देताना सांगितलेल्या अटी आणि शर्थींचं त्यांनी पालन करावं. ते भाजपावर टीका करतील, चुकीचं बोलतील तर आम्हाला देखील उत्तर द्यावं लागेल.’ असं देखील यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील अनिल देशमुख यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.
भाजपकडून अनिल देशमुखांना सांगितलं जात होतं की, तुम्ही पक्ष बदला, विचार बदला, आणि नेतृत्व बदला.
परंतु देशमुख यांनी तुरूंगात जाण्याची तयारी दर्शविली पण पक्षाची साथ सोडली नाही. असे शरद पवार म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrasekhar Bawankule | chandrashekhar bawankule warning to anil deshmukh over bjp party joining offer
हे देखील वाचा :
Shubman Gill | ‘या’ खेळाडूंना मागे टाकत शुबमन गिल ठरला ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’