पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोथरुड येथील चांदणी चौकात (Chandni Chowk,kothrud) कामाची पाहणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बुधवारी केली. कामाची पाहणी करत असताना चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले. चांदणी चौक येथील उतारावर पत्रकारांशी संवाद साधत असताना तीव्र उतारावरुन येणाऱ्या दुचाकी चालकाची गाडी त्याठिकाणी असलेल्या गर्दीत घुसली. त्यावेळी चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil) तिथे उपस्थित होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुर्दैवाने कार्यकर्ते आजूबाजूला असल्याने चंद्रकांत पाटील यांना काहीही झालं नाही. दुचाकीस्वाराने मद्यपान केल्याच्या शंकेवरुन कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कर्यकर्त्यांना थांबवलं. ‘थांबा त्याला मारु नका’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांत केल.
कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर पाटील यांनी दुचाकीस्वाराची चौकशी केली.
तुला लागलं नाही ना अशी विचारपूस त्यांनी केली.
पाटील यांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांनी दुचाकीस्वाराला तेथून जाऊ दिले.
हा सर्व प्रकार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
Web Title :- Chandrakant Patil | pune kothrud accident in front of chandrakant patil
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Police Inspector Transfer | बदलून आलेल्या ‘या’ 10 पोलीस निरीक्षकांच्या पुणे आयुक्तालयात नियुक्त्या
PM Modi | PMO च्या ‘कानपिचक्या’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर झाले ‘बंद’ !