Chandrakant Patil | पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | Maharashtra State Govt positive regarding leased land of Panshet flood affected rehabilitated cooperative societies - Chandrakant Patil

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Chandrakant Patil | पुणे जिल्ह्यातील (Pune District) सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांना ( Panshet Flood Affected Rehabilitation Cooperative Societies) भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी संदर्भात शासन सकारात्मक आहे. याबाबत मालक आणि भाडेकरू यांचे हक्क आबाधित ठेवून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी (Chandrakant Patil) यावेळी सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आज विधानभवन (Vidhanbhavan) येथील मंत्री महोदय यांच्या दालनात सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसीत सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी बोलत होते. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) , मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता (Aseem Kumar Gupta IAS) , पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh), अँड. वर्षा डहाळे (Adv Varsha Dahale) आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री पाटील म्हणाले की, पुणे शहरातील पानशेत पूरग्रस्त सहकारी सोसायट्यांना भाडेपट्टी देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याबाबत शासनाच्या वतीने ८ मार्च २०१९ रोजी शासन निर्णयाद्वारे निर्णय घेण्यात आला आहे. या सहकारी गृहनिर्माण संस्थाना भाडेपानी देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर (Maharashtra State Govt) जिल्हाधिकारी, पुणे कार्यालयाकडून (Pune Collector Office) वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. यासंदर्भात तेथील नागरिकांच्या मागण्या व अडचणींचा विचार करून तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या सूचना विचारात घेवून लवकरच सकारात्मक निर्णय घेवू, असेही मंत्री पाटील यावेळी सांगितले.

 

पानशेत पुरानंतर विस्थापीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसीत सहकारी सोसायट्यांच्या अनाधिकृत, बेकायदेशीर सभासद,
सभासदाने परस्पर सोसायटीचे सभासदस्य बदलले बाबत, अ नोंदणीकृत दस्ताने झालेले हस्तांतरण, घुसखोर,
बिगर पूरग्रस्त सभासद, तसेच वाणिज्य वापराचे प्रयोजन व दराबाबत, ८ मार्च २०१९ नंतर झालेले
अनाधिकृत हस्तांतरण, मागासवर्गीय सोसायटीबाबत, पूरग्रस्त सभासदाने दुबार लाभ अथवा दोन घरे
घेतल्याबाबत अशा अनेक महत्वपुर्ण मुद्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Chandrakant Patil | Maharashtra State Govt positive regarding leased land of Panshet flood affected rehabilitated cooperative societies – Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता -चंद्रकांत पाटील

Attack On Police Officer | जुगार अड्डयावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जुगार्‍यांचा हल्ला, 5 पोलिस जखमी