Chandrakant Patil | शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Chandrakant Patil | अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. (Chandrakant Patil)
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे (Dr. Kiran Moghe) यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रसिद्धी उपक्रमांची माहिती दिली.
अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनावर आधारित विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. एलईडी स्क्रीन असलेले दोन चित्ररथ जिल्ह्यातील सुमारे १५० गावातून फिरणार आहे. चित्रफितीच्या माध्यमातून शासकीय योजनांवर आधारित यशकथा आणि योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. वाहनावरही योजनांची माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे सहकार्य लाभले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrakant Patil | Guardian Minister Chandrakant Patil inaugurated Chitraratha, which provides information about government schemes
हे देखील वाचा :
Pune Crime News | ताडीवाला रोड पसिरात दहशत पसरविणार्या गुन्हेगारी टोळीवर ‘मोक्का’
Comments are closed.