पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) हल्लाबोल केला आहे. तुम्ही रोज उठून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Nrendra Modi) चौकीदार चोर हे म्हणता, हे चालणार नाही. नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, सरकारमध्ये असतानाही शिवसेनेची बाहेर पडण्याची हिंमत नव्हती. त्यावेळी ते कोरे कागद घेऊन फिरायचे. राज्यात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याची सुरुवात कोणी केली ते एकदा तपासले पाहिजे. तुम्ही रोज उठून नरेंद्र मोदींना (Nrendra Modi) चौकीदार चोर हे म्हणता, हे चालणार नाही. नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कधी कुणाच्या बायकोवर आरोप केले नाहीत. ते रोज उठून अमृता वहिनीवर आरोप करत असतात.
तरीही त्यांनी किती संयम बाळगायचा. संजय राऊतांच्या नवाब मलिकांच्या पत्नीबद्दल कोणी काही बोललं का ? शरद पवारांच्या कुटुंबाबद्दल कोणी काही बोललं का? राजकारणात असणाऱ्यांनी एकमेकांवर बोलावं.
अमृता वहिणीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांना त्यांचं करिअर आहे.
तरीही त्या शांत राहतात. असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले, वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलेलं राजकारण थांबले पाहिजे का? या सवालावर पाटील म्हणाले की, कोंबडी आधी की अंडे आधी हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जर असं वाटत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे. 4 पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून राजकारणाबाबत काहीतरी आचारसंहीता ठरवली पाहिजे. पुरावे नसतानाही तुम्ही आरोप करता, तीनही पक्षाचे प्रवक्ते एकत्र येऊन आरोप करतात. तरीही आम्ही एकटे त्यांना पुरून उरतो. असं पाटील यांनी म्हटलं आहे.
Web Title : Chandrakant Patil | chandrakant patils warning to mahavikas aghadi government said more faith narendra modi his parents will not remain silent.