सांगली :बहुजननामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज (मंगळवारी) सांगली (Sangli) जिल्हा दौ-यावर होते. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
सांगली येथील पेठ नाका येथे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार प्रसंगी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित होते.
त्यावेेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजप (BJP) हाच महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांचा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तर, शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना, असा टोला देखील पाटील यांनी लगावला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सध्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने 21 जागा जिंकल्या. त्यामुळे भाजप (BJP) राज्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे.
काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) 17 जागा मिळाल्या तर शिवसेनेला फक्त 12 जागाच मिळाल्या. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपला पक्षच संपवला आहे. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला.
तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाहीये. असो, हा त्यांचा प्रश्न आहे.
यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल. असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे.
Web Title : Chandrakant Patil | bjp state president chandrakant patil criticize shivsena about chief minister post in sangli.