मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– शिवसेनेचे निष्ठावंत नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Cabinet Minister Eknath Shinde) काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार सूरतमध्ये असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गुजरात भाजपच्या (Gujarat BJP) काही नेत्यांसोबत संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यात वेगळी समीकरण जुळू पाहाताहेत का अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून ते नाराज असल्याचं मी टेलिव्हिजनवर पाहिलं. शिवसेनेचा हा पक्षांतर्गत विषय असून याबाबत आम्हाला अद्याप काहीच कल्पना नाही. जनतेने दिलेलं बहुमत नाकारून राष्ट्रवादीसोबत (NCP) केलेला घरोबा त्यांना पटलेला नसावा, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एकनाथ शिंदेंनी प्रस्ताव दिल्यास स्विकारु
एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा काही प्रस्ताव दिला तर स्वीकारणार का? असे विचारण्यात आलं असता चंद्रकांत पाटील यांनी नक्कीच याचं भाजप स्वागत करेल, असं म्हटलं. आम्ही काही भजनी मंडळी नाही. आम्हीही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे असा काही प्रस्ताव आला तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे अशापद्धतीचं कोणताही प्रस्ताव भाजपकडे आला तर आम्ही नक्कीच त्याबाबत विचार करु, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.
राऊतांमुळे ही परिस्थिती
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला संजय राऊत (Sanjay Raut) यांना जबाबदार धरलं. संजय राऊत महान नेते आहेत. त्यांच्या महानतेमुळेच शिवसेना (Shivsena) अडचणीत आली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर आजची वेळ आल्याचे ते म्हणाले.
Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil big statement regarding formation of government with eknath shinde
हे देखील वाचा :
Sanjay Raut | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर