Chandrakant Patil At Bhau Rangari Ganpati | मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन; टीका करणाऱ्यांबाबत म्हणाले – ‘त्यांना मदत करण्यासाठी रोखलेले नाही, मदत फक्त पुनीत बालन करतील असा काही आदेश निघालेला नाही’ (Videos)
पुणे : Chandrakant Patil At Bhau Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’च्या बाप्पाचे दर्शन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
पुण्यातील गणेशोत्सव आणि पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून झालेल्या टीकेवर माध्यमांनी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “टीका करणारे जे आहेत त्यांना सार्वजनिक गणपती उत्सवाला मदत करण्यासाठी रोखलेले नाही. मदत फक्त पुनीत बालन करतील असा काही आदेश निघालेला नाही”, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
बाप्पाकडे काय मागितलं यावर बोलताना ते म्हणाले, “या देशातल्या सर्वसामान्य माणसाला कोणाच्या मदतीवर जगणं आवडत नाही. त्याला रोजगार मिळून तो त्यांच्या पैशाने कुटुंब चालवेल. त्याच्या मुलीचं लग्न तो करेल. यात त्याला जो आनंद असतो तो अनुदानावर नसतो.
या देशात ज्या महिलांना घरकामांमुळे आठ तास नोकरी शक्य नसल्याने चार तासाची नोकरी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते परदेशात जाऊदेत, चांगली पॅकेजेस मिळूदेत, पाऊस चांगला पडूदेत, पीक चांगलं येउदेत, भाव चांगला मिळूदेत”, अशी मागणी बाप्पाकडे केल्याचे त्यांनी सांगितलं.
Comments are closed.