नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार सी. के. नायडू यांची कन्या आणि देशातील पहिली महिला क्रिकेट कॉमेंट्रिटर चंद्रा नायडू यांचे रविवारी (दि. 4) निधन झाले. चंद्रा नायडू या सेवानिवृत्त प्राध्यापिका होत्या.
त्यांनी आपले वडील सी.के. नायडू यांच्यावर पुस्तक लिहले असून त्याचे शीर्षक अ डॉटर रिमेम्बर्स असे आहे. अनेकदा महिलांना क्रिकेटमध्ये फार आवड नसल्याचे सर्वसाधारणपणे दिसून येते. पण चंद्रा नायडू यांना क्रिकेटमध्ये आवड होती. त्यातूनही त्यांनी कॉमेंट्री सुरू केली.
त्यामुळे त्या देशातील पहिल्या महिला क्रिकेट कॉमेंट्रिटर म्हणून ओळखल्या जातात. सी.के नायडू हे क्रिकेट विश्वातील मोठ नाव आहे. नायडू यांच्या नावावर आजही क्रिकेटरांना अनेक पुरस्कार दिले जातात.