बहुजननामा ऑनलाइन : सध्या सोशल मीडियावर शाळेतील एका मुख्याध्यापकाचे महिला शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करतानाचा विडिओ वायरल होत आहे. हा संतापजनक प्रकार पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील तलवाड़ा येथील एका सरकारी शाळेत घडला आहे. ज्यात शाळेचे मुख्याध्यापक दोन महिला शिक्षकांसोबत अश्लिल चाळे करत आहे. शिक्षकांच्या या व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु हा विडिओ बनावट असल्याचे मुख्याध्यापकाचे म्हणणे आहे.
हे दोन्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. व्हिडिओमध्ये महिला शिक्षिका कार्यालयात प्रवेश करते आणि दोघे एकमेकांच्या गळ्यात पडतात. त्यानंतर त्यांचे अश्लील चाळे सुरु होतात. त्यानंतर दोघेही वेगळे होतात, नंतर शिक्षिका आणि मुख्याध्यपकांमध्ये काहीतरी संवाद होतो आणि पुन्हा ते एकमेकांच्या गळ्यात पडतात. तसेच दुसऱ्या विडिओ मध्ये दुसरी महिला शिक्षिका आरोपीच्या बाजूला बसलेली दिसते आणि स्वाक्षरीसाठी रजिस्टर पुढे करते. आरोपी कोणाशी तरी फोनवर बोलत असताना महिलेचे चुंबन घेत आहे.
परंतु आरोपी मुख्याध्यापकाने हे सर्व आरोप फेटाळले आहे. हा व्हिडीओ बनावट असल्याचे मुख्याध्यापकाचे म्हणणे आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या या अश्लील प्रकारामुळे काही शिक्षक त्रस्त होते. त्यामुळे या कृत्यांचा पुरावा म्हणून मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छुपा कॅमेरा लावण्यात आला. ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.