Chandan Nagar Pune Crime News | पुणे: जमीन खरेदी-विक्रीत 25 लाखांची फसवणूक; गणेश चोंधे, गणेश काळे चंदन चचलानी आणि यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : – Chandan Nagar Pune Crime News | जमीन खरेदी-विक्रीत एका ज्येष्ठ नागरिकाची 25 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत खराडी येथील रिलायन्स मॉल (Reliance Mall Kharadi) जवळ घडला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत सदानंद कुंडलिक थोरात (वय-59 रा. गुरुदक्षिणा बिल्डींग, उबाळेनगर, वाघोली) यांनी मंगळवारी (दि.25) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश चोंधे (रा. चव्हाण रेसीडन्सी, राष्ट्रवादी ऑफिस समोर, उंड्री), गणेश काळे (रा. मते नगर, वडगाव शेरी, पुणे), चंदन घनश्याम चचलानी (रा. विशाल नगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी व त्यांच्या पत्नीला जमीन खरेदी करण्यास सांगून त्यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना विसार पावती, करारनामा केला. त्यानंतर जमीन विक्रीतून पाच लाख रुपये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मात्र, आरोपींनी जमीन न देता तसेच जमिनीच्या व्यवहारासाठी घेतलेली रक्कम आणि नफा न देता एकूण 25 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली असता आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर थोरात यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
युवकाची सात लाखांची फसवणूक
वाघोली : इन्स्टाग्रामवर संपर्क साधून एका तरुणाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करुन घेतले. तरुणाला आयपीओ देतो आणि स्टॉक मार्केट टिप्स मार्फत आर्थिक फायदा करुन देतो असे आमिष दाखवून 6 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हिना मेहता व विरड गांधी नाव सांगणाऱ्या व्यक्तींवर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत घडला असून याप्रकरणी निलेश किसन शिंदे (वय-38 रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर करीत आहेत.
Comments are closed.