बहुजननामा ऑनलाईन – दिल्लीत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. वाहतुक पोलीसांनी चलान कापू नये म्हणून दिल्लीतील कॅबचालक कंडोम जवळ बाळगत असल्याची अफवा पसरली आहे.. याचे कारणही अत्यंत हास्यास्पद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर वाहतुक पोलीसांनी कॅब चालक धर्मेंद्रला थांबवले. त्यानंतर त्याचा प्रथोमपचाराचा बॉक्स चेक केल्यावर त्यात त्यांना कंडोम आढळून आले. हे पाहताच पोलीसांनी त्याचे चलान कापले.
मात्र धर्मेंद्रने सांगितले की, कंडोम न ठेवल्याने त्याचे चलान कापण्यात आले होते. त्यानंतरच त्याने कंडोम ठेवायला सुरवात केली. तथापि, त्यांना ओव्हरस्पीडसाठी दंड आकारण्यात आला होता असे कारण पोलीसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर सर्व कॅबचालक वाहतुक पोलसांनी दंड आकारु नये म्हणून त्यांच्या प्रथमोपचार बॉक्स मध्ये कंडोम ठेवत आहे. तर काही कॅबचालकांनी म्हणण्यानुसार, पोलीसांनी त्यांच्या गाड्यांची चेकिंग केली मात्र कंडोमबाबत कोणतीही विचारणा केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मोटर वाहन कायद्यात गाड्यामध्ये कंडोम ठेवण्याबाबत कुठेही उल्लेख आढळत नाही. तर सर्वोदय ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीत गिल म्हणाले की, अडचणीच्या काळात किंवा लहान जखम झाल्यास रक्तप्रवाह थांबविण्यासाठी कंडोमचा वापर होऊ शकतो. दरम्यान एक सप्टेंबरपासून नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच दंड भरावा लागत आहे.
Visit : bahujannama.com