पुणे : बहुजननामा ऑनलाईन – चाकण कंपनीतील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका चिनी अधिकार्याचाही समावेश आहे. चाकनमधील चिनी कंपनीतील काही कर्मचार्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर, त्यांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी यातील 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता 130 कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यात 9 चिनी अधिकार्यांचाही समावेश आहे,अशी माहिती खेड तालुक्याच्या आरोग्य अधिकार्यांनी दिली.
कर्मचारी पुण्यातील एका चिनी कंपनीत काम करत होते. चाकणमध्ये ही कंपनी असून कोरोनाची लागण झालेल्या कर्मचार्यांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिनी अधिकारी 25 मार्चआधीच पाहणी करण्यासाठी चाकणमध्ये आले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन आणि विमान प्रवास बंद केल्यानंतर ते इथेच अडकले. गेल्या आठवड्यात एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कारखान्यातील सर्व कर्मचार्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे संपूर्ण कंपनी सील करण्यात आली असून, 130 कर्मचार्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.