Chakan-Mahalunge Traffic Jam Issue | पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून चाकण व महाळुंगेमध्ये होणाऱ्या वाहतुक कोंडीची पाहणी; तात्काळ घेतली नियोजन आढावा बैठक

August 2, 2024

पिंपरी : Chakan-Mahalunge Traffic Jam Issue | पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) यांनी आज चाकण (Chakan Police Station) व महाळुंगे पोलीस ठाणेचे (Mahalunge Police Station) हद्दीमध्ये वाहतुक कोंडी (Chakan Traffic Jam) समस्या निवारण संदर्भात पाहणी करुन गॅब्रियल कंपनी, चाकण येथे संयुक्त वाहतुक नियोजन आढावा बैठक घेतली.

https://www.instagram.com/reel/C-IZCjepdRb/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

      बैठकीकरिता आ. दिलीप मोहिते पाटील MLA Dilip Mohite Patil (खेड विधानसभा सदस्य - Khed Assembly) , नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडीयाचे (NHAI)  05 अधिकारी, एमआयडीसी इंजिनियर, तहसीलदार खेड, गट विकास अधिकारी खेड, कार्यकारी अधिकारी चाकण नगरपरिषद, परिवहन वाहतुक आयुक्त व परिवहन वाहतुक निरीक्षक, पिंपरी चिंचवड मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळाचे 03 अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, प्रकल्प अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, मा. खासदार शिरुर यांचे स्वीय सहायक, नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडीयाचे 02 कंत्राटदार, राज्य वाहतुक विभागाकडील 02 अधिकारी तसेच पोलीस उप-आयुक्त वाहतुक, पोलीस उप-आयुक्त परि.-3, सपोआ वाहतुक, सपोआ चाकण विभाग, पोलीस निरीक्षक वाहतुक, चाकण व महाळूंगे तसेच चाकण व महाळुगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि औद्योगिक विकास महामंडळ, खाजगी कंपन्यांचे एच.आर.ओ. इत्यादी अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये चाकण व महाळुंगे परिसरातील वाहतुक समस्यांचा आढावा घेवून सध्याची वाहतूक गर्दीची समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत तसेच इतर संबंधित विभागासोबत संयुक्त कार्यवाही करून समस्या निवारणाबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.