बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या इन्फेक्शनने भारतीय वंशाचे सिलेब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोज यांचा मृत्यू झाला आहे. फ्लॉएड कार्डोज हे 59 वर्षाचे होते. न्यू जर्सीमध्ये राहणारे कार्डोज यांना 19 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा मेडिकल रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. धक्कादायक म्हणजे फ्लॉएड कार्डोज याच महिन्यात मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी एक पार्टीही दिली होती. अनेकांना त्यांनी पार्टीला निमंत्रित केले होते. आता कार्डोज यांनी दिलेल्या पार्टीला गेलेल्या प्रत्येकांच्या चिंता वाढली आहे.
फ्लॉएड कार्डोड यांचे न्यू यॉर्कमध्ये शेज फ्लॉएड, बॉम्बे कँटीन आणि ओ पेड्रो नामक रेस्तराँ आहेत. मुंबईसह गोव्यातही फ्लॉएड यांचे रेस्तराँ आहेत. फ्लॉएड काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी एक पार्टीही दिली होती. त्यात जवळपास 200 जण सहभागी झाले होते. न्यू जर्सीला परत गेल्यानंतर फ्लॉएड यांनी व्हायरल फीवर झाला होता.
त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर टेस्टिंगमध्ये त्यांना कोरोना व्हायरस झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 773 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.