मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह समितीने (Air Marshal Manvendra Singh Committee) या घटनेची संपूर्ण चौकशी (Inquiry) केली आहे. कायदेशीर सल्ला (Legal Advice) घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे (Weather) क्रॅश झाल्याचे समितीच्या चौकशीतून समोर आल्याचे सांगितले जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत
वायुसेनेच्या (Air Force) वतीने या अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कराणांचा तपास करत असलेल्या समितीने अहवालात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे वैमानिक (Pilot) विचलित झाले असावे, यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच Controlled Flight Into Terrain असे म्हटले जाते, असे सांगितले जात आहे. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.
8 डिसेंबर रोजी झाली होती दुर्घटना
सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे आपल्या पत्नासह वेलिंगटन (Wellington) येथे एका कार्यमासाठी जात असताना 8 डिसेंबर रोजी भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये बिपीन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला होता. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हा अपघात झाला. दोन इंजिन असलेले IAF MI-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जाते. परंतु हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली. हे हेलिकॉप्टर सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे मुख्यत्वे वापरले जाते.
Web Title :- CDS Bipin Rawat | cds bipin rawat helicopter crash reason and big information came out report