नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या तुलनेत एससी-एसटी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एससी-एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ५० रुपयांवरून १२०० रुपये तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ७५० वरून १५०० रुपयांवर आले आहे.
The Central Board of Secondary Education (CBSE) has increased the fees of Class 10 and 12 Board Examinations for SC and ST students from Rs 50 to Rs 1,200. The amount has been doubled for the students belonging to general category, who will now have to pay Rs 1,500. pic.twitter.com/Zi8b5gnayH
— ANI (@ANI) August 11, 2019
गेल्या आठवड्यातच सीबीएसई बोर्डाने फी वाडीची अधिसुचना काढली आहे. ज्या शाळांनी जुन्या नियमानुसार दहावी बारावीच्या परीक्षेची नोंदणी सुरु केली आहे. त्यांना आता विद्यार्थ्यांकडून नव्या नियमानुसार शुल्क वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१२ वी बोर्डाच्या परीक्षेसाठी एससी-एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयासाठी ३०० रुपये जास्त भरावे लागणार आहेत. त्यापुर्वी अतिरिक्त विषयासाठी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क नव्हते. मात्र १०० टक्के दृष्टीहीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सुट देणअयात आली आहे. तसेच शेवटच्या तारखेपर्यंत जे विद्यार्थी नव्या नियमानुसार नोंदणी करणार नाहीत. त्यांची नोंदणी होणार नाही. त्यामुळे त्यांना २०१९-२० च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
त्यासोबतच विद्यार्थ्यांची मायग्रेशन फी देखील १५० वरून ३५० रुपये करण्यात आली आहे. तर परदेशातील सीबीएसईच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच विषयांच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी १०,००० रुपये शुल्क भपावे लागणार आहे. तर यापुर्वी ५००० हजार रुपये शुल्क होते. तर अतिरिक्त विषयासाठी १००० रुपयांऐवजी आता २००० हजार शुल्क भरावे लागणार आहे.