नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 15 फेब्रुवारीपासून सीबीएसई परीक्षा सुरु होणार असून यासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशनने परीक्षेच्या दोन दिवस अगोदर उत्तरपत्रिकेत रोल नंबर भरण्याबद्दल सूचना दिली आहे.
बोर्डाने वेबकास्ट करत बोर्डाने परीक्षेचे नियम आणि निर्देशांबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना माहिती दिली आहे. सोबतच बोर्डाने उत्तरपत्रिकेत रोल नंबरबद्दल माहिती देताना सीबीएसइच्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकेवर कशा प्रकारे रोल नंबर भरायचा आहे, हे सांगितले आहे.
यावेळी बोर्डाचा रोल नंबर आठ आकडी असून याअगोदर तो सात अंकीच होता. रोल नंबर 1 ने सुरू झाल्यावर ग्रीड बॉक्सच्या बाहेर 1 लिहा आणि पहिल्या ओळीत 1 च्या खालील जागा रंगवा. याच प्रकारे बाकीच्याही अंकांनाही करायचे आहे.