नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयने बाहुबलीचे माजी खासदार अतीक अहमद याचा मुलगा मोहम्मद उमरचे पोस्टर प्रसिद्ध केले असून त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. लखनऊच्या एका व्यावसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी सीबीआय मोहम्मद उमरचा शोध घेत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून मोहम्मद उमर फरार आहे. व्यावसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी मोहम्मद उमरच्या नावावर एफआयआर नोंदविला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उमरविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविली आहे.
कोण आहे मोहम्मद उमर
यापूर्वी , सीबीआयच्या पथकाने आरोपी उमरच्या शोधात बुधवारी प्रयागराजमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. मोहित जयस्वाल यांनी बाहुबलीचे माजी खासदार अतीक अहमद, त्याचा मुलगा उमर, गुर्गे फारुख, झाकी अहमद, जफर उल्लाह, गुलाब सरवार इत्यादींविरुध्द लूट, हप्ता वसुली करणे आणि अन्य गुन्ह्यांच्या विरोधात डिसेंबर 2018 मध्ये लखनौच्या कृष्णनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने 12 जून 2019 रोजी माफिया डॉन अतीक अहमद आणि त्याचा मुलगा उमर आणि इतर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतीक अहमदला उत्तर प्रदेशातील देवीया जेलमधून हलविण्यात आले आणि गुजरातच्या तुरुंगात पाठविण्यात आले. अतीक अहमद सध्या अहमदाबाद मध्यवर्ती कारागृहात बंद आहे.