नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने बुधवारी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि कर्ज प्रकरणाशी संबंधीत आणखी एका घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एजन्सीने कपिल आणि धीरज वाधवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघे भाऊ आर्थिक संकटात सापडलेल्या दीवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर आहेत आणि मनी लॉड्रिंगसह फसवणुकीच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. सीबीआयनुसार, कपिल आणि धीरज वाधवान यांनी 14 हजार कोटींची बनावट होमलोन अकाऊंट तयार करून केंद्र सरकारकडून 1,880 कोटींची सबसिडी मिळवली. मोदी सरकारने ऑक्टोबर 2015 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची सुरुवात केली होती.
या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातील लोकांना हौसिंग लोन दिले जाते. तर खालच्या आणि मध्यम वर्गाच्या लोकांना क्रेडिड लिंक्ड व्याज सबसिडी दिली जाते. याच सबसिडीसाठी डीएचएफएलने अगोदर हजारो कोटींची बनावट कर्ज खाती तयार केली आणि नंतर त्याबदल्यात सरकारकडून सबसिडी मिळवली. सीबीआयनुसार डिसेंबर 2018 मध्ये डीएचएफएलने गुंतवणुकदारांना सांगितले की, त्यांनी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत 88,651 खातेधारकांना कर्ज दिले आहे आणि सबसिडी म्हणून सरकारकडून 539.4 कोटी रुपये मिळवले आहेत. याशिवाय 1,347.8 कोटी सबसिडी बाकी आहे.
मात्र, फॉरेन्सिक तपासात समजले की, कपिल आणि धीरज वाधवान यांनी 2.6 लाख बनावट कर्ज खातील उघडली आहेत. यापैकी अनेक लोक अकाऊंट प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत उघडण्यात आली आहेत आणि वाधवान बंधुंनी या बनावट खात्यांसाठी सरकारकडून सबसिडी सुद्धा मिळवली आहे. हे सर्व प्रकरण कंपनीच्या मुंबई येथील बांद्रा ब्रँचमधून झाले आहे. केंद्रीय एजन्सीनुसार 2007 ते 2019 च्या दरम्यान वाधवान बंधुंनी बनवलेल्या बनावट कर्ज खात्यांना 14,406 कोटींची रक्कम देण्यात आली. सीबीआयचा आरोप आहे की, यापैकी 11,755.79 कोटी संशयित फर्म्सला ट्रान्सफर करण्यात आले.
जून 2020 मध्ये सीबीआयने वाधवान बंधु आणि येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याविरूद्ध चार्जशीट दाखल केले होते. हे प्रकरण डीएचएफएलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कपूर कुटुंबाला लाच देण्याचे आहे. हे प्रकरण प्रकरण एप्रिल-जून 2018 चे आहे, जेव्हा येस बँकेने जनतेचे 3,700 कोटी रुपये शॉर्ट टर्म डिबेंचर म्हणून डीएचएफएल मध्ये गुंतवले. बदल्यात वाधवान बंधुंनी येस कपूर यांना कर्ज म्हणून 600 कोटी रूपये दिले. ही रक्कम येस कपूरची पत्नी आणि मुलीच्या नियंत्रणाखालील एका कंपनीला देण्यात आली होती.
एप्रिल 2020 मध्ये वाधवान बंधुंना अटक झाली, तर येस कपूरला मार्चमध्ये अटक झाली होती.