नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) अधिकाऱ्यांना येथून पुढे जीन्स, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालता येणार नाही. सीबीआयचे नवनिर्वाचित संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पदभार स्विकारताच आपल्या अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. जयस्वाल यांनी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल केले आहेत.
1985 सालच्या बॅचचे IPS अधिकारी असलेल्या सुबोधकुमार जयस्वाल यांनी सीबीआयचे 33 वे संचालक म्हणून पदभार हाती घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ हा 2 वर्षांसाठी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन सदस्यीय निवड समितीत जयस्वाल यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. आगामी काळात CBI मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा त्यांचा मानस आहे.
कृपया हे देखील वाचा:
सरकार 3 महिन्यांसाठी देत आहे मोफत इंटरनेट ? जाणून घ्या ‘सत्य’
चमत्कार ! मजूरांचे रातोरात बदलले होते नशीब, खोदकामात जमिनीत गाडलेला लाखो रुपयांचा ‘खजिना’ मिळाला
… म्हणून देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली – WHO
पुण्यात लाचखोरी रोखण्यासाठी ‘गुगल पे’ची ‘मात्रा’?
मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस