पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी विधानसभेत बोलताना दिले.
पुणे विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांना काही तास काम केल्यानंतर त्यांच्या बँकखात्यात मानधन जमा केले जाते पण, गेल्या काही वर्षापासून विद्यापीठात बोगस विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम बेकायदा घेण्याचा प्रकार सुरु आहे. या प्रकरणी आमदार विजय काळे आणि भीमराव तापकीर यांनी लेखी प्रश्न विचारला होता. प्रश्न उत्तराच्या तासामध्ये हा प्रश्न चर्चेला घेण्यात आला त्यावेळी वायकर यांनी ही कबुली दिली.
झालेल्या प्रकरणाची विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर विरोधकांनी चौकशी ना करता कारवाई करा अशी मागणी केली त्यावर बोलताना राज्यमंत्री वायकर यांनी म्हंटले कि, ‘गैरप्रकार झाला असेल, याप्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे राज्यमंत्री वायकर यांनी सांगितले आहे.