भिडेंवरील गुन्ह्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडून पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना समन्स
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भीमा कोरेगावमध्ये २०१८ मध्ये हिंसाचार झाला होता. याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावरून भिडे यांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्या प्रकरणावरून वकील आदित्य मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती यावरून महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिस अधीक्षकांना समन्स बजावले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधातील गुन्हा मागे घेण्याबाबत विधानसभेत वक्तव्य केलं होतं. परंतु अजून भिडेंविरोधातील गुन्हा तसाच आहे. असे वकील आदित्य मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यावरून मानवाधिकार आयोगाने पुण्याच्या एसपीना समन्स पाठवले आहे. तर वकील मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले, भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंविरोधात असलेल्या गुन्ह्याच्या तपासाची सद्यस्थिती काय आहे याची माहिती द्या. तसेच कायद्यानुसार न्याय मिळावा, अजुन किती काळ FIR ची टांगती तलवार भिडे गुरुजींच्या डोक्यावर ठेवणार? असा प्रश्नही वकील आदित्य मिश्रा यांनी विचारला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना संभाजी भिडेंविरोधात कोणताही पुरावा नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ज्या महिलेनं भिडेंविरोधात तक्रार दाखल केली, त्यांच्यावर हिंसाचाराचे आरोप केले तिने कोर्टासमोर भिडेंना ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच तिने फक्त भिमा कोरेगाव प्रकरणी लोक काय म्हणतात याच्या आधारावर तक्रार दाखल केली होती. अशी माहिती फडणवीस यांनी २७ मार्च २०१८ मध्ये रोजी विधानसभेत दिली होती.
Comments are closed.