बंगळुर : वृत्तसंस्था – दोन कारच्या धडकेत तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ४ जण बचावले आहेत, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहे. त्याचीही प्रकृती गंभीर असल्याच समजत आहे. तमिळनाडूहून होसुरू मार्गाने यात्रेहू परतणाऱ्या भाविकांच्या कारला हा भीषण अपघात झाला. कारचा अपघात हा खूप भयानक होता, कारचा हा चुरा झाला आणि तेरा जण जागीच मरण पावले त्यामध्ये १ वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश होता.
कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यात कुनिगल टक इथे कारची दुसऱ्या कारला धडक बसली गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडी थेट डिव्हायडर तोडून पलिकडून जाणाऱ्या गाडीवर धडकली. अशी स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार समजलं आहे.
हे सर्व भाविक देवदर्शन करून येत असताना हा भीषण अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या गाडीत अडकलेले मृतदेह गाडी कापून बाहेर काढावे लागले. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे.