बहुजननामा ऑनलाइन टीम – अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालावरून राजकारण सुरू आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जो बाइडेन यांच्याकडून आपला पराभव मानण्यास तयार नाहीत. ते सातत्याने निवडणुकीत(Capitol Hill Violence) गोंधळ झाल्याचा आरोप करत आहेत. तसेच इलेक्टोरल प्रोसेससुद्धा प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हरकतींमुळे त्रासलेल्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामने मोठी अॅक्शन घेतली आहे. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट 12 तासांसाठी सस्पेन्ड केले आहे. फेसबुकने ट्रम्प यांचे पेज 24 तासासाठी सस्पेन्ड केले आहे, तर इंस्टाग्रामने सुद्धा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अकाऊंट 24 तासासाठी बॅन केले आहे. ट्विटरने इशारा दिला आह की, जर ट्रम्प यांनी निवडणुकीबाबत भडक वक्तव्य करणे सुरूच ठेवले तर त्यांचे अकाऊंट कायमसाठी ब्लॉक केले जाईल.
फेसबुकने 24 तासाठी ब्लॉक केले ट्रम्प यांचे पेज
फेसबुक न्यूजरूमकडून ट्विट करण्यात आले आहे की, प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या विरूद्ध आम्ही दोन व्हॉयलन्स पॉलिसी अंतर्गत अॅक्शन घेतली आहे. ट्रम्प यांचे फेसबुक पेज 24 तासाठी ब्लॉक केले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा हटवण्यात आला आहे. म्हणजे या दरम्यान ट्रम्प काहीही पोस्ट करू शकणार नाहीत.
इंस्टाग्रामने सुद्धा 24 तासांठी ट्रम्प यांना केले बॅन
ट्विटर-फेसबुकच्या नंतर इंस्टाग्रामने सुद्धा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 24 तासासाठी ब्लॉक केले आहे. इंस्टाग्रामचे हेड एडम मसॅरी यांनी म्हटले, आम्ही प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचे इंस्टा अकाऊंट 24 तासांसाठी लॉक करत आहोत.
दरम्यान, ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प समर्थकांच्या जमावाने यूएस कॅपिटल हिल बिल्डिंगच्या बाहेर धुमाकुळ घातला. अमेरिकेचे प्रेसिडेंट इलेक्ट जो बाइडेन यांनी यूएस कॅपिटल हिलमध्ये ट्रम्प समर्थकांच्या या हिंसेला राजद्रोह जाहीर केले आहे.
फेसबुकने हटवला ट्रम्प यांचा व्हिडिओ
फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी, गाय रोसेन यांनी म्हटले, आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटवला आहे, कारण आमचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरू असलेली हिंसा कमी करण्याऐवजी वाढवत आहे.
ट्रम्प यांनी केले शांततेचे आवाहन
ट्रम्प यांनी हिंसक झालेल्या आपल्या समर्थकांना आवाहन केले की, मी अमेरिकन कॅपिटलमध्ये सर्वांना शांततेचे आवाहन करतो. हिंसा होऊ नये. लक्षात ठेवा, आपण कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पक्ष आहोत. कायदा आणि पुरूष-महिलांचा सन्मान करा. धन्यवाद!
कशी सुरू झाली हिंसा
हा सर्व गोंधळ ट्रम्प यांच्या भाषणानंतर सुरू झाला. बाइडेन यांच्या विजयावर संसदेच्या अंतिम निर्णयाने घाबरलेल्या ट्रम्प यांनी अगोदरच वॉशिंग्टनमध्ये एक मोठी रॅली आयोजित केली होती. या रॅलीत आलेले समर्थक ट्रम्प यांच्या भाषणानंतर हिंसक झाले. ट्रम्प यांनी थेट म्हटले की, अमेरिकन निवडणुकीत गडबड झाली आहे आणि बायडेन यांची मते कम्प्युटरमधून आली आहेत.
ट्रम्प यांनी हे मानण्यास नकार दिला की बाइडेन यांना 8 कोटी मते मिळाली आहेत. इकडे ट्रम्प भाषण देत होते, तिकडे जमाव ट्रम्प-ट्रम्पच्या घोषणा देत होता. याच दरम्यान समर्थक ससंदेच्या आत घुसले. मात्र, जमाव पाहून ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केल, परंतु ट्रम्प यांचे आवाहन केवळ नाममात्र होते.